High tides at Marine Drive (Photo Credits: ANi)

मागील 2 दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसलेला पाऊस आजही कायम आहे. रात्रभर कोसळणा-या मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात जोरदार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचले आहे. सततच्या पावसाने मुंबईतील रेल्वे वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईमध्ये पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने सरकारकडून गरज असल्यास बाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसोबतच शासकीय, निम शासकीय ऑफिस कर्मचार्‍यांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

त्यातच बीएमसी ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, आज म्हणजेच 2 जुलैला सर्वात मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे सांगितले आहे. दुपारी 11 वाजून 52 मिनिटांनी मुंबईच्या समुद्रात 4.59 मीटरच्या लाटा उसळणार असल्याचे सांगण्यात येतय. BMC ची समुद्री भरतीची संपुर्ण यादी येथे पाहा

हेही वाचा- Mumbai Monsoon 2019 High Tide Alert: राज्यात पावसाची दमदार एंट्री! BMC ने जाहीर केलं समुद्री भरतीचं वेळापत्रक; पहा संपूर्ण यादी

दरम्यान पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभागाला ही यादी पुरवली असून उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच नागरिकांना देखील वेळापत्रक पाहून सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे.