High Tide in Mumbai | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबईसह राज्यभर पावसाने शुक्रवार पासून जोर धरला आहे, तीन दिवसांपासून संतत गतीने बरसणाऱ्या पावसाच्या सरींमुळे दादर (Dadar), हिंदमाता (Hindmata) , सायन (Sion) , अंधेरी (Andheri) , साकीनाका (Sakinaka) , गांधी नगर (Gandhi Nagar) इत्यादी परिसरात  पाणी साचण्याच्या (Waterlogging)  घटना समोर आल्या आहेत. येत्या दिवसात सुद्धा हा पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे. मुसळधार पावसाच्या वेळी सर्वात मोठी चिंता असते ती समुद्राला येणा-या भरतीची (High Tide) . त्यामुळे बीएमसीने (BMC) सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तातडीची उपाययोजना आरंभली आहे, यासाठी मुंबईत कोणत्या दिवशी समुद्रात कमी जास्त भरती होउ शकते याचा अंदाज वर्तवणारे एक वेळापत्रक बीएमसी तर्फे जाहीर करण्यात आले आहे.

BMC ट्विट

बीएमसीच्या वेळापत्रकानुसार, जुलै ते सप्टेंबर दरम्यान समुद्रात एकूण 23 वेळा 4.6 मीटरहुन अधिक उंचीच्या लाट उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यामध्ये जुलै महिन्यात 5 तारखेला, ऑगस्ट मध्ये 3 तारखेला आणि सप्टेंबरमध्ये 1 तारखेला मोठी भरती येणार असल्याचे सांगण्यात आले आहे .यात 5 जुलैला दुपारी 2.06 मिनिटांनी, 3 ऑगस्ट ला 1.44 मिनिटांनी आणि 1 सप्टेंबरला 1.15 मिनिटांनी सर्वात मोठी भरती येणार असल्याचे म्हंटले आहे. देशातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार, नागरिकांना दक्षतेचा इशारा

दरम्यान पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने मुंबईतील वाहतूक व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभागाला ही यादी पुरवली असून उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच नागरिकांना देखील वेळापत्रक पाहून सावधानता बाळगण्याचा इशारा दिला आहे.