Monsoon Update: मान्सून लवकरच मराठवाड्यात,  ठाणे, रायगड, औरंगाबाद, जळगाव जिल्ह्यात वादळीवारे, मेघगर्जनेसर पावसाची शक्यता- हवामान विभाग
Monsoon | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

राज्यात मान्सूनचे (Monsoon Update) आगमन झाल्याने वरुनराजाने बरसण्यास सुरुवात केली आहे. काल दिवसभरात कोकण, मुंबई आणि ठाणे, रायगड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी पावासने दमदार हजेरी लावली. आज मान्सून (Monsoon 2022) स्थितीत फारसा बदल झाला नाही. मात्र, मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक वातावरणनिर्मीती झाली आहे. पुढील अवघ्या 24 तासातच मान्सून मराठवाड्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, पुढच्या काही तासांमध्ये ठाणे (Thane), रायगड (Raigad), औरंगाबाद (Aurangabad) , जळगाव (Jalgaon) या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, मेघरर्जना आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी ट्विट करुन माहिती देताना म्हटले आहे की, मान्सूनच्या रेषेत आज फारसा कोणताही बदल झाला नाही. मात्र, अरबी समुद्रासह कोकणातील उर्वरीत भागात आणि गुजरातमधील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रात मोडणारा काही भाग यांमध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. याशिवाय कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बंगालचा उपसागर परिसरातही मान्सूनला पोषक असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या 24 तासात मान्सून दमदार उपस्थिती दर्शवण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Monsoon Rain 2022: यंदा मान्सून दमदार, पावसाळ्याच्या चारही महिन्यात होणार पर्जन्यवृष्टी; ऑस्ट्रेलीयन हवामान विभागाचा अंदाज)

ट्विट

दक्षिण मराठवाड्यातील काही भाग वगळता मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, ठाणे, रायगड, औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात पुढच्या दोन ते तीन तासांत प्रचंड मेघगर्जना, मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय जळगावमध्येही साधारण प्रतितास 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने म्हटले आहे की, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेरही पडू नये.