Delhi Capital IPL Team Bus | PC: Twitter/ANI

मनसेच्या वाहतूक शाखेकडून मुंबई मध्ये Delhi Capital IPL Team च्या पार्किंग मधील बसची तोडफोड करण्यात आली आहे. या बस वर त्यांनी 'मनसए दणका' असे पोस्टर देखील चिटकवले आहेत. दरम्यान आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करणार्‍या या व्होल्वो बस आहेत. काल रात्री मनसे कडून ही तोडफोड करण्यात आली आहे. ANI Tweet च्या माहितीनुसार पोलिसांनी 5-6 अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयपीसीच्या  Sections 143,147,149,427  अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान आयपीएल मधील खेळाडूंना ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबई मधील व्यावसियांना न दिल्याने मनसे आक्रमक झाली आहे. राज्यातील बस वाहतूकदारांऐवजी ही व्यवस्था स्थानिकांऐवजी बाहेरच्यांना देण्यात आल्यावर मनसेचा आक्षेप आहे. स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम दिलं जावं अशी मनसेची मागणी आहे. नक्की वाचा:  Delhi Capitals ने IPL 2022 Season साठी समोर आणली नवी जर्सी (Watch Video) .

दिल्लीच्या गाड्यांवर कोणताही कर भरावा लागत नसल्याने ते कमी टेंडर भरतात पण महाराष्ट्रातील लोकांना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागत आहे. आधीच लॉकडाउनमुळे आर्थिक नुकसान झाले आहे त्यामध्ये आता उद्योगधंदा नाही. त्यामुळे स्थानिकांना काम मिळावं या मागणीसाठी आता मनसे आक्रमक झाली आहे.

यंदा मुंबई, पुण्यात आयपीएलचे सामने रंगणार आहेत. 26 मार्चपासून आयपीएलच्या हंगामाला सुरूवात आहे. वानाखेडे स्टेडियम वर पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान होणार आहे.