MNS | (Photo Credits: Twitter)

मनसे (Maharashtra Navnirman Sena)विधानसभा उमेदवार सुमेध भवार (Sumedh Bhawar) यांच्याकडून राष्ट्रवादी पक्षाचे सचिन अहिरेकर यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी अंबरनाथ येथील कल्पना हॉटेलच्या बाहेर घडली. यात सचिन अहिरेकर (Sachin Ahirekar)गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर अंबरनाथजवळील (Ambernath)शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवीगाळ केल्यामुळे आपण ही मारहाण केल्याचे सुमेध भवार यांनी सांगितले आहे.

या घटनेनंतर अहिरेकर यांनी सांगितले की, माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित असल्याचे अहिरेकर यांनी म्हटले आहे. शनिवारी भवार यांनी अहिरेकर यांना अंबरनाथच्या महात्मा गांधी शाळेजवळ भेटायला बोलावले, तिथे या दोघांमध्ये झालेल्या वादानंतर भवार आणि त्यांच्या अंगरक्षकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अहिरेकर यांनी केला आहे, असे सचिन अहिरेकर यांनी सांगितले. परंतु, अहिरेकर यांनी आपल्याला आणि राज ठाकरे यांना शिवीगाळ केली. तसेच सचिन अहिरेकर यांनी फोनकरून शिवीगाळ करत त्यांनी ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप सुमेध भवार यांनी केला आहे. हे देखील वाचा-मनसेचे पक्ष चिन्ह बदलले? राज ठाकरेंनी हटवला झेंडा, उरले फक्त इंजिन

भारतीय जनता पक्षातून भवार यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने मनसेत जाऊन विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भवार यांच्याकडे सचिन अहिरेकर हा स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होता. मात्र, भवार मनसेत गेल्यानंतर अहिरेकर यांनी भवार यांच्याकडे काम बंद केले होते. तसेच अहिरेकर यांनी भवार यांचं विधानसभा निवडणुकीच्यावेळी काम केले होते. निवडणुकीच्यावेळी आधी रिपाइं आठवले गटाकडून विधासभेची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भाजपात आणि तिथे ही उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी मनसेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली होती.