मनसेचे पक्ष चिन्ह बदलले? राज ठाकरेंनी हटवला झेंडा, उरले फक्त इंजिन
राज ठाकरे (संग्रहित संपादित प्रतिमा)

येत्या 23 जानेवारीला मनसेचे (MNS) महाअधिवेशन मुंबईत होत आहे. गेले काही महिने पराभवाचे दुःख पचवणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मनसेने आता कात टाकून नवीन जोमाने उभे राहायचे ठरवले आहे. त्याची सुरुवात पक्षाची निशाणी अथवा लोगोने (Logo) झाली आहे. गेले काही दिवस मनसेचे पक्ष चिन्ह बदणार अशा बातम्या येत होत्या. आता मनसेच्या सोशल मिडियावरून याची प्रचीती यायला सुरुवात झाली आहे. मनसेच्या पूर्वीच्या पक्ष चिन्हावरून झेंडा गायब झाला आहे व आता फक्त इंजिन उरले आहे. पक्षाच्या ट्वीटरवर नवीन चिन्ह दिसून येत आहे. मात्र मनसेच्या नवीन निशानीचे अनावरण 23 तारखेच्या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे.

मनसेच्या पूर्वीच्या झेंड्यात निळा, भगवा, पांढरा आणि हिरवा असे रंग होते. यामध्ये पक्षाचे चिन्ह असलेले इंजिन आहे. आता नव्या हे चारही रंग गेल्याचे दिसत आहे. सध्या फक्त इंजिन असलेले दिसून येत आहे मात्र झेंड्याचे रंग जाऊन त्याठिकाणी भगवा रंग येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता मनसेचा नवा झेंड होणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यादिवशी मनसेचे महाअधिवेशन पार पडणार आहे.

(हेही वाचा: मनसे आपला झेंडा बदलणार? काय असणार राज ठाकरे यांची पुढील रणनीती? वाचा सविस्तर)

2013 पासून मनसे पराभावाचे धक्के खात आहे. 2019 मध्येही पक्ष आपले पाय मजबूर रोवण्यात अयशस्वी ठरला. आता राज ठाकरे आपल्या पक्षासह नव्या जोमाने पुन्हा नवी सुरुवात करण्याचा विचार करीत आहे. यासाठी कदाचित 'हिंदुत्व' या मुद्द्याचा आधार घेतला जाऊ शकतो.