Raj Thackeray | (Photo Credit - Twitter)

ठाणे (Thane) येथील सभेमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या सभेतील एका कृत्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे. भर सभेत तलवार नंगी तलवार उंचावल्याबाबतचे हे प्रकरण आहे. ठाणे येथील सभामंचावर राज ठाकरे यांचे आगमन होताच मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले होते. हे स्वागत करत असताना त्यांना तलवारही देण्यात आली होती. ही तलवार राज ठाकरे यांनी म्यानातून काढून सर्वांसमोर उंचावली होती. अशा प्रकारे तलावर दाखवण्यावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या आधी अशाच प्रकारे तलवार दाखल झाल्याने भाजप नेते मोहीत कंबोज आणि मविआमधील दोन मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता इतरांना जो न्याय तोच न्याय राज ठाकरे यांनाही लावणार का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राज ठाकरे यांच्या ठाणे येथील भाषणाचीही तपासणी केली जाणार आहे. त्यांच्या भाषणात जर काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यावरुनही गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मनसेतून या सर्व चर्चेबाबत काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Sanjay Raut on Raj Thackeray: राज ठाकरे यांचा 'भोंगा' ईडीचे अभय मिळाल्याने वाजतोय, संजय राऊत यांचा पलटवार)

राज ठाकरे यांनी ठाणे येथे दमदार भाषण केले. या भाषणात त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. भाषणाच्या सुरुवातीसच त्यांनी म्हटले की, सभेला येतानाच मला एक अग्निशमन दलाचा बंब पाहायला मिळाला. याव कोटी करताना ते म्हणाले, घाबरु नका मी इतकीही आग लावणार नाही. अनेक लोक मला शिवाजी पार्क येथील सभेत भाजपची स्क्रिप्ट बोलून दाखवली म्हणून टीका करत आहेत. पण लक्षात ठेवा उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जरी टीका करण्याची वेळ आली तर तेव्हाही मी बोलेन असे ठाकरे म्हणाले.