Sandeep Deshpande Anticipatory bail: मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावर आज फैसला, महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरण
Sandeep Deshpande | (Photo Credit : Facebook)

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतष धुरी (Santosh Dhuri) यांना अटकपूर्व जामीन मिळणार की कारवाई होणार यार आज (17 मे) फैसला होणार आहे. महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पाठीमागील काही दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, देशपांडे हे सध्या गायब आहेत. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल घेतला आहे. मुंबईतील भोंगा आंदोलनावेळी झालेल्या महिला पोलीस धक्काबुक्की प्रकरणी पोलीस संदीप देशपांडे आणि संतष धुरी यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, संदीप देशपांडे यांच्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तो सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

काय आहे प्रकरण?

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनुसार मशिदींवरील भोंगे हटविण्यासंदर्भात मनसेने काही दिवसांपूर्वी आंदोलन सुरु केले होते. या वेळी राज्यातील आणि प्रामुख्याने मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी मनसे नेत्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली होती. या वेळी संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांचे निवास्थान शिवतीर्थ बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. मात्र, संधी मिळताच संदीप देशपांडे यांनी पोलिसांना चकवा देत पळ काढला. (हेही वाचा, Loudspeaker Row In Maharashtra: मनसे नेते संदीप देशपांडेंवर गुन्हा दाखल, शोध सुरु)

संदीप देशपांडे यांनी पोलिसांना चकवा देऊन पळ काढताना त्यांना पकडण्यासाठी पोलीस धावले. मात्र, संदीप देशपांडे यांना पकडण्यासाठी पोलीस धावले मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या वेळी झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाल्या. त्यानंतर पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. दरम्यान, बेपत्ता असलेल्या या दोन्ही नेत्यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज सुनावणी पार पडते आहे.