
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना आता घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरसची लागण आता राजकीय नेते मंडळींना सुद्धा झाल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज बंगल्यावरील तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची गोष्ट समोर आली होती. परंतु या सुरक्षा रक्षकांनी कोरोनावर मात केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या बाबत चिंता करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकसत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. परंतु आता या पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा दिला आहे.(मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; यंदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी न करण्याचं आवाहन!)
दरम्यान, सध्या राज्यात लॉक डाऊन 5 मध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक घराबाहेर पडत आहे. हीच परिस्थिती राहिली तर संक्रमित रुग्णांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत कोविड वॉरिअर्स सुद्धा सध्याच्या काळात जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाबाधितांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून सुद्धा प्रयत्न करण्यात येत आहेत. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 54085 वर पोहचला असून 1954 जणांचा बळी गेला आहे. तसेच 24209 जणांची प्रकती सुधारल्याची माहिती समोर आली आहे.