शिवसेनेकडून  Uddhav Thackeray च्या सभेच्या टिझर मध्ये Raj Thackeray यांच्या सभेतील गर्दीचे फोटो' मनसे प्रवक्ते Gajanan Kale यांचा दावा
Raj Thackeray and Gajanan Kale (Photo Credits: Facebook)

औरंगाबाद सभा नंतर आता अयोद्धा दौरा याच्या माध्यमातून शिवसेना आणि मनसे एकमेकांना शह-प्रतिशह देण्याचा प्रयत्न करत आहेत. मनसेच्या सभेदरम्यान जसे राज ठाकरेंचे (Raj Thackeray) टीझर व्हिडिओ शेअर झाले तसेच आता शिवसेनेकडून (Shiv Sena) टीझर व्हिडिओ शेअर केले जात आहे. पण आज शिवसेनेने जारी केलेल्या टीझर व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी राज ठाकरेंच्या सभेचे काही फोटो आल्याचा दावा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केला आहे. गजानन काळे यांनी त्याबद्दलचे ट्वीट देखील केले आहे.

'शिवसेनेने मनसेचे नगरसेवक चोरता चोरता आता फोटोही चोरल्याचा' आरोप केले आहेत. 'असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा..काहीतरी अस्सल तुमचे असुद्या.

इतके ही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हिडिओ मध्ये गर्दी मनसेच्या सभेची...अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का ..? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की...नकली हिंदुत्ववादी' असं ट्वीट करत गजानन काळे यांनी शिवसेनेवर खरमरीत टीका केली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अयोद्धेमध्ये राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या अयोद्धा दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर 'असली आ रहा है नकली से सावधान' म्हणत शिवसेनेने मनसे वर हल्लाबोल केला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि मनसे मध्ये टशन सुरू आहे. नक्की वाचा: Brij Bhushan Sharan Singh On Raj Thackeray: भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध, तीव्र शब्दांत टीका .

गजानन काळे ट्वीट

मनसे मागील काही दिवसांपासून मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याच्या मागणीवरून आक्रमक झाली आहे. हिंदुत्त्वाची कास धरत आता पुन्हा आपल्या पक्षात 'नवनिर्माण' करू इच्छिणार्‍या राज ठाकरेंना रोखण्यासाठी सध्या राज्यात अनेक मनसे कार्यकर्त्यांवर दडपशाही केली जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी एका पत्राद्वारा केला आहे. या पत्रात त्यांनी सत्ता येत जात असते, आमच्या संयमाचा अंत पाहू नका असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.