Navi Mumbai: वाशी टोल नाक्याच्या तोडफोड प्रकरणी आज राज ठाकरे कोर्टात हजर राहणार, नवी मुंबईत मनसे कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी
मनसे (Photo credit: IANS)

Navi Mumbai:  मनसे  (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना नवी मुंबईत टोक नाक्या (Navi Mumbai Toll Naka) संदर्भात भडकाऊ भाषण दिले होते. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांना वारंवार समन्स धाडून सुद्धा हजेरी लावली नव्हती. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून त्यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. याच कारणास्तव आज राज ठाकरे स्वत: कोर्टात हजर राहणार आहेत.(BMC Election 2021: मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी शक्य ते सर्व करु; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचा शिवसेनेला इशारा)

राज ठाकरे प्रथम सकाळी 10.30 वाजता सिबीडी मधील कोर्टात हजेरी लावणार आहेत. त्यानंतर 11 वाजता सिवूड येथील मनसेच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. परंतु नवी मुंबईत आज राज ठाकरे येणार असल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. तसेच शहरात बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे. कोर्टात राज ठाकरे उपस्थितीत राहिल्यानंतर त्याच्या आवारात फक्त चार ते पाच कार्यकर्ते तेथे असणार आहेत. दुसऱ्या बाजूला येत्या एप्रिल महिन्यात नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणूका सुद्धा होणार आहेत. त्यामुळे आजच कार्यकर्त्यांनी नवी मुंबईत राज ठाकरे यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.(महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक 2021 च्या निकालानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, ट्विटच्या माध्यमातून केली 'मोठी' घोषणा)

दरम्यान, 26 जानेवारी 2014 मध्ये राज ठाकरे यांनी वाशी मध्ये टोल नाक्यावरुन भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी टोल नाक्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर भडकाऊ भाषण दिल्याचा ठपका  लावण्यात आला. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्या या भाषणानंतर मोठ्या प्रमाणात वाशीतील टोल नाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता. तर  राज ठाकरे यांना याच प्रकरणी कोर्टाकडून वारंवार समन्स धाडले जात होते. तर समन्सचा कार्यकाल जानेवारीत संपल्यानंतर 6 तारखेसाठी त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.