Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले ग्रामपंचायत निवडणूक 2021 निकाल (Maharashtra Gram Panchayat Election 2021 Result) समोर येताच राजकारणाचे संपूर्ण चित्रच बदलून गेले. एकूणच निकालानंतर महाविकासआघाडी आणि भाजपा दोन्ही पक्ष आपलाच पक्ष पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करत आहे. अशातच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या प्रतिक्रियेची सर्वांना उत्सुकता होती. राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून या निवडणूक निकालाबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत एक महत्त्वाची घोषणा देखील केली आहे.

"ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या," असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.हेदेखील वाचा- Shiv Sena on Gram Panchyat Election Result: विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली - शिवसेना

राज ठाकरे यांच्या ट्विटमधून ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या समोर येतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच यात ते महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकालांबाबत काही गौप्यस्फोट करतील अशी शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 36 जागी विजय मिळविला आहे. दुसरीकडे 2 हजार 344 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी झालेल्या अपक्ष उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या जागापेक्षा अधिक आहे.

दरम्यान कोविड-19 (Covid-19) संकटाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभांना देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती देण्यात आली आहे. चारहून अधिक ग्रामपंचायतींची जबाबदारी एका अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याने एकाच वेळी सर्व ग्रामसभांना उपस्थित राहणे शक्य होणार नाही. यामुळेच मार्च अखेरपर्यंत ग्रामसभांना स्धगिती देण्यात आली आहे.