जे लोक पाकिस्तानात (Pakistan) जाऊन नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांना केक भरवून आले. त्या लोकांनी इतरांना देशभक्तीची प्रमाणपत्रं देण्याची आजिबात गरज नाही. त्यांनी इतरांना देशभक्ती शिकवण्याची गरज नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray ) यांनी लगावला आहे. ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे मनसे (MNS ) पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीदरम्यान, राज ठाकरे प्रसारमाद्यमांशई बोलत होते. दुष्काळ दौरा म्हणजे दुष्काळ टुरीझम नव्हे, असेही राज ठाकरे यांनी या वेळी सांगितले.
दुष्काळी दौरा कारण्याचा सध्या तरी विचार नाही. दुष्काळात लोकांची आवस्था प्रचंड करुण असते. जर माझ्या हातात त्यांना मदत करण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे माझ्यासाठी दुष्काळी दौरा केवळ दुष्काळी टुरीझम नाही. त्यामुळे सध्या मी हा दौरा करणार नाही. पण, मी दुष्काळाची महिती मी नेहमीच घेत राहतो. भविष्यात दुष्काळी दौरा काढू असेही राज ठाकरे यांनी सांगितले. दुष्काळामध्ये लोक दौरे काढून पैसा आणि वेळ वाया घालवत आहेत. हे अभ्यास दौरे काढणाऱ्यांना एकदा विचारा की दुष्काळी दौऱ्यावर गेल्यानंतर तुम्ही नेमका अभ्यास काय केला. सरकार विविध दावे करतं आहे, पण, दुष्काळ निवारणासाठी सरकारने नेमकं काय केलं हे सरकार का सांगत नाही? असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला. (हेही वाचा, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक; विधानसभा निवडणूक रणनिती ठरण्याची शक्यता)
जगात अशक्य असे काहीच नाही, जगभरामध्ये दुष्काळ पडतात. किंबहून आपल्यापेक्षाही इतर देशांमध्ये भयावह दुष्काळ पडतात. मात्र, त्यावरही विविध तंत्रज्ञान आणि योजनांच्या माध्यमातून लोक प्रभुत्व मिळवत नंदनवन उभारतात. राज्यात विविध लोक दुष्काळ निवारणासाठी काम करत असताना राज्य सरकार नेमकं काय करतं आहे? दुष्काळ निवारणासाठी सर्वात अधिक पैसा हा सरकारकडे असतो. सरकारकडे पैसा आहे तर, मग सरकार तो पैसा खर्च का करत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.
प्रसारमाध्यमांनी मला माहिती नसतानाच माझा दुष्काळी दौरा कसा काय जाहीर केला असा सवाल विचारत मला ही माहिती आपल्याकडूनच कळली अशी कोपरखळीही राज ठाकरे यांनी या वेळी प्रसारमाध्यमांना मारली.
सरकार चुकीचं वागत असले की त्यावर टीका ही व्हायलाच पाहिजे. त्याच्या विरोधात बोलायलाच पाहिजे. मग ते सरकार कोणाचंही असो. उद्या माझं सरकार जरी आलं तरी माझ्या सरकारवरही तुम्ही टीका करायला हवी, असे सांगतानाच मराठा आरक्षण मुद्द्यावरुन सरकारने विद्यार्थ्यांची फसवणूक केली. आरक्षण मिळाल्याचे सांगत जे लोक पेढे वाटत होते. त्या लोकांना बोलवून विचारा आता हे असं कसं झालं म्हणून, असेही राज ठाकरे म्हणाले.