MNS Against Inflated Power Bills: मनसे कडून मुंबई, पुणे, नाशिक मध्ये वाढीव वीज बिलांविरोधात मोर्च्याला सुरूवात
MNS | Image Used For Representative Purpose (PC - Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) आज (26 नोव्हेंबर) राज्यभर वाढीव वीज बिल (Inflated Power Bills) विरोधात एल्गार मोर्चा जाहीर करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे आता या मनसेच्या मोर्च्याला सुरूवात झाली आहे. दरम्यान राज्यातील कोविड 19 चा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने मनसेच्या मोर्च्याला परवानगी नकारली आहे. अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. पुण्यामध्ये शनिवार वाड्याजवळ जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मोर्च्याला परवानगी नाकारल्यानंतर पुण्यात अनेकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. MNS On Electricity Bill: सोमवारपर्यंत वाढीव वीज बिल माफ न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा, बाळा नांदगावकरांचे राज्य सरकारला अल्टिमेटम

मुंबई मध्ये मनसेच्या मोर्च्याला सुरूवात झाली आहे. त्याचं नेतृत्त्व बाळा नांदगावकर करत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आंदोलन करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मुंबई मध्ये कोरोना परिस्थितीचं भान ठेवत मनसे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य पोलिसांना सहकार्य करत आंदोलन करतील असे बाळा नांदगावकर म्हणाले आहे. मुंबईत वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसे मोर्चा धडकणार आहे. दरम्यान मुंबई जिल्हाधिकार्‍यांना ते एक निवेदन देणार आहेत. ठाणे: वाढीव वीजबिलाविरोधात आता मनसे रस्त्यावर उतरणार, अविनाश जाधव यांनी दिला इशारा.

लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना सरसकट वीज बीलं देण्यात आली आहेत. या वाढीव बिलांच्या विरोधात आता मनसे सामान्यांच्या सोबतीने रस्त्यावर उतरली आहे. राज्य सरकारने सामान्यांना वीज बिलामध्ये सूट द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या हा शांतपणे मोर्चा काढून सरकारला एक निवेदन दिलं जाईल. मात्र त्याची सरकारने दखल घेतली नाही तर भविष्यात मनसे आक्रमक होईल असे सांगण्यात येत आहेत.