Jignesh Mevani | (Photo Credits: Facebook)

गुजरात येथील आमदार जिग्नेश मेवानी (Gujarat MLA Jignesh Mevani) यांना असम पोलिसांनी (Assam Police) काल रात्री उशीरा अटक केली. गुजरात येथील पालनपूर सर्किट हाऊस (Palanpur Circuit Hous) येथून त्यांना अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यांना काल रात्री अहमदाबाद (Ahmedabad) येथे नेण्यात आले. आज (21 एप्रिल) त्यांना असमला नेण्यात येईल. मेवानी यांनी सप्टेंबर 2021 मध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला होता. दलित नेता आणि राजकीय पक्षाचे राष्ट्रीय दलित अधिकार मंचाचे संयोजक असलेल्या मेवानी यांच्या अटकेचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही माहिती पुढे येते आहे की, अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन त्यांची काही ट्विट्स स्थगित करण्यात आली आहेत.

जिग्नेश मेवानी यांच्या सहकाऱ्यांचा दावा आहे की, पोलिसांनी अटक करताना मेवानी यांना एफआयआरची कॉपीदेखील दाखवली नाही. मेवानी यांना अटक करणारे असम पोलीस त्यांना घेऊन आज गुवाहाटी येथे घेऊन जाणार असल्याचे समजते. गुजरातमधील अहमदाबाद येथून त्यांना गुवाहटीला नेले जाण्याची शक्यता आहे. जिग्नेश मेवानी गुजरात विधानसभेचे सदस्या आहेत. गुजरातच्यावडगाम येथून ते निवडून आले आहेत. ते एक वकील, कार्यकर्ता आणि माजी पत्रकार आहेत. (हेही वाचा, Congress च्या पंजात Kanhaiya Kumar; 28 सप्टेंबरला पक्षप्रवेश; राहुल गांधी यांच्या वर्तुळात स्थान मिळण्याची शक्यता)

जिग्नेश मेवानी यांनी गुजरात विधानसभेची निवडणूक अपक्ष लढली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यांनी राजकीय कार्यकर्ता आणि जेएनयूचे माजी विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत एक संयुक्त पत्रकार परिषदही घेतली होती. याच पत्रकार परिषदेवेळी कन्हैय्या कुमार हे काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. तर मेवाणी यांनी गांधींना आपला पाठिंबा दिला होता.