Mira Bhayandar: ड्राईव्ह करताना Earphones घालणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; 250 इयरफोन जप्त करून जाळले
Mumbai Traffic Police. Representative Image. (Photo Credits: PTI)

वाहन चालवताना कानात Earphones घालून फोनवर बोलणारे, किंवा गाणी ऐकणारे महाभाग कित्येकदा ताकीद देऊन सुद्धा ऐकत नसल्याने आता ठाणे ग्रामीण (Thane Rural) मधील वाहतूक नियंत्रण विभागाने नुकतीच एक महत्वपूर्ण कारवाई केल्याचे समजत आहे. वाहतूक पोलिसांच्या या नव्या मोहिमेत Earphones घालून ड्राइव्ह करणाऱ्या तब्बल 250 रिक्षाचालकांचे इयरफोन जप्त करून त्यांना अक्षरशः जाळून टाकण्यात आले आहे. मीरा भाईंदर(Mira Bhayandar) येथे आजपासून या मोहिमेला सुरवात झाली असून यापुढे कोणीही अशी चूक करताना आढळल्यास त्यांना सुद्धा अशाच कारवाईला सामोरे जावे लागेल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. एका वर्षात पुणेकरांनी भरला तब्बल 81 कोटी रुपयांचा दंड; कारण वाचून बसेल धक्का

प्राप्त माहितीनुसार, या मोहिमेची माहिती आणि वाहन चालवताना मोबाईल फोनच्या वापर केल्याचे दुष्परिणाम सर्वांना समजावेत यासाठी आता सुरुवातीला काही वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे आज ऑन ड्युटी कर्मचार्‍यांनी या नियमाचे उल्लंघन करणार्‍यांना दंड केला नाही मात्र त्याऐवजी चूक केलेल्या वाहन चालकांचे हेडफोन जप्त करून जवळच्या जंक्शनवर जाळले गेले आहेत. मोबाईल फोनवर संगीत बोलण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी इयरफोन / हेडफोन वापरत असताना प्रवाशांना नेणार्‍या ऑटो रिक्षाचालकांविरोधात वाहतूक विभागाकडून वारंवार तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान,कानात इयर फोन असल्याने अनेकदा प्रवाशांना काय सांगायचे आहे हे रिक्षा चालकांना समजत नाही त्यामुळे ऑटो रिक्षा चुकीच्या दिशेने निघाल्यामुळे भांडणे व मारामारी झाली होती. वाहन चालविताना फोनवर बोलणे किंवा ईयरफोनद्वारे किंवा हेडफोनद्वारे संगीत ऐकणे हा दंडनीय गुन्हा आहे. यावर रोख बसावी म्हणून ही मोहीम सुरूच राहील, असे वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले.