MHT CET 2021 PCM Admit Card: महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या पीसीएम ग्रुप विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट जारी; cetcell.mahacet.org वरून असं करा डाऊनलोड
Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

महाराष्ट्र सीईटी सेल (Maharashtra Common Entrance Test Cell) कडून यंदाच्या MHT CET 2021 परीक्षेसाठी हॉल तिकीट जारी करण्यात आलं आहे. यंदा सीईटी परीक्षेत पीसीएम किंवा Engineering entrance examination साठी रजिस्ट्रेशन केलेल्यांची देखील हॉल तिकीट्स प्रसिद्ध करण्यात आली आहे. सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईट वर म्हणजेच cetcell.mahacet.org वरून विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिट कार्ड्स डाऊनलोड करण्याची सोय आहे. यंदा या परीक्षा 20 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. नक्की वाचा: Maharashtra CET 2021 Exam Date: महाराष्ट्र सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर; mahacet.org वर पहा संपूर्ण वेळापत्रक.

दरम्यान Maharashtra MHT CET 2021 यांनी इंजिनियरिंग अ‍ॅडमिशन परीक्षा 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जातील असं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासाठी Undergraduate Entrance Examination मध्ये अंदाजे दरवर्षी 5 लाख विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात. JEE Main Result 2021: जेईई मेन निकाल जाहीर, 100% गुण मिळवत 18 जणाना रँक 1 मध्ये, महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट याचाही समावेश.

MHT CET 2021 Admit Card कसं कराल डाऊनलोड?

  • cetcell.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.
  • नवी विंडो ओपन होताच MHT CET – Engineering admissions window चा पर्याय निवडा.
  • आता तुमचा Application number आणि जन्म तारीख टाकून लॉगिन वर क्लिक करा.
  • account login window मधून तुमचं अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल.

इथे पहा पीसीएम चं अ‍ॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठीची डिरेक्ट लिंक!

परीक्षार्थ्यांच्या अ‍ॅडमीट कार्ड वर परीक्षा केंद्र आणि परीक्षेची वेळ याची माहिती दिलेली असेल.दरम्यान यंदा कोविड 19 च्या प्रादुर्भावाखाली परीक्षा होत असल्याने सुरक्षित वातावरणामध्ये परीक्षा व्हावी याकरिता विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. त्याची देखील माहिती आता अ‍ॅडमीट कार्ड वर असेल त्यामुळे ती देखील वाचून त्याचं पालन करणं आवश्यक आहे.