मुंबईमधील म्हाडाच्या घरांसाठीच्या लॉटरी (MHADA lottery flat) मध्ये सर्वात महागडं घर भाजपा आमदार नारायण कुचे (Narayan Kuche) यांना लागलं होतं. ताडदेव (Tardeo) मधील या घराची किंमत सुमारे ₹7,57,94,268 आहे. पण मीडीया रिपोर्ट्सनुसार त्यांनी Crescent Tower मधील हा फ्लॅट आर्थिक कारणांमुळे परत केला आहे. हाय इन्कम ग्रुप फ्लॅट कॅटेगरी मधील हा फ्लॅट 1531 स्क्वेअर फूटचा आहे. हा विद्यमान आमदार, खासदारांसाठी राखीव गटातील फ्लॅट होता. दरम्यान या फ्लॅट साठी वेटिंग लिस्ट मध्ये केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचे नाव आहे. त्यामुळे आता या फ्लॅटचे मालक होणार का? हे पहावं लागेल.
HT शी बोलताना कुचे यांनी दिलेल्या माहितीनुसार, " मला वाटलं होतं बॅंका 90% कर्ज देतील पण फ्लॅटच्या किंमतीनुसार मला 5 कोटीचं कर्ज मिळणार आहे. इतर पैशांची जुळवाजुळव करण्याइतपत रक्कम माझ्याकडे नसल्याने मी फ्लॅट परत करणार असल्याचं' कुचे म्हणाले.
कुचे यांनी म्हाडाच्या लॉटरीमध्ये HIG flat आणि शेड्युल कास्ट अशा दोन गटांमध्ये अर्ज केले होते. आता HIG flat च्या वेटिंग लिस्ट मध्ये कराड यांचं नाव आहे. त्यांनीही हा फ्लॅट नाकारला तर तो जनरल वेटिंग लिस्ट मधील उमेदवाराला विचारला जाईल. Mumbai MHADA Lottery Result 2023 Winners List: मुंबई म्हाडा लॉटरीचे निकाल जाहीर; पहा 4082 घरांसाठी भाग्यवान विजेत्यांची यादी.
मुंबईच्या विविध भागातील 4,082 घरांपैकी 2,790 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) होती, ज्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 1,947 सदनिका समाविष्ट होत्या. अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) सदनिकांची संख्या 1,034 होती, तर 139 घरे मध्यम-उत्पन्न गटासाठी (MIG) आरक्षित होती आणि 120 घरे HIG श्रेणीतील होती.
म्हाडाचे खासगी इमारतीत जुन्या गृहनिर्माण योजनेनुसार बिल्डरला जादा एफएसआय देऊन सात सदनिका आहेत. रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते ताडदेव येथील म्हाडाच्या फ्लॅटची किंमत बाजारभावापेक्षा 25 ते 30 टक्क्यांनी कमी आहे.