Mumbai MHADA Housing Lottery Result 2023: म्हाडा चं मुंबईतील सर्वात महागड्या घराचे भाग्यवान विजेते ठरले भाजपा आमदार नारायण कुचे
Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई च्या म्हाडाच्या घरांसाठी काल (14 ऑगस्ट) सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईत म्हाडाने सर्वात महाग म्हणजे 8 करोडचं घर भाजपा आमदार नारायण कुचे (BJP MLA Narayan Kuche) यांना लागलं आहे. नारायण कुचे हे भाजपाचे जालनाचे बदनापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. म्हाडाने ताडदेव मध्ये हे घर ₹7,57,94,268 किंमतीमध्ये ठेवले आहे. 1531 स्क्वेअरफूटचे हे घर Crescent Tower, Tardeo मध्ये आहे.

HT ला प्रतिक्रिया देताना कुचे यांनी या निमित्त आपलं मुंबई मध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं असल्याचं म्हटलं आहे. 'माझं मुंबई मध्ये घर नव्हतं. या म्हाडाच्या लॉटरी च्या निकालामध्ये मला ताडदेवचं घर लागल्याचा एसएमएस आला. आता पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मला कर्ज घ्यावं लागणार असल्याचं' ते म्हणाले आहेत.

Crescent Tower मधील हा फ्लॅट विद्यमान आमदार, खासदारांच्या कोट्यातील होता. या घरासाठी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी देखील अर्ज केला होता. त्यांचं नाव वेटिंग लिस्ट मध्ये आहे. जुन्या राहिलेल्या घरांच्या यादीमध्ये म्हाडाकडे 7 फ्लॅट्स आहेत बाजारभावापेक्षा ताडदेवचा हा फ्लॅट 25-30% कमी दरात उपलब्ध असल्याचं रिअल इस्टेट एजंट सांगतात.

4082 विविध गटातील घरांसाठी काल लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 4 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईकरांना ही घरं घेण्याची संधी मिळाली होती. त्यानुसार मुंबईकरांनी घरांसाठी लाखांच्या घरात अर्ज केले होते.

एलआयजी श्रेणीतील कोट्याअंतर्गत शिवसेनेच्या (ठाकरे गट) आमदार अमश्या पाडवी यांना गोरेगाव येथे फ्लॅट मिळाला आहे. पाडवी हे आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात.