राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षांमुळे (MPSC Exams) म्हाडाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात (MHADA Exams Timetable) बदल करून नवे वेळापत्रकाप्रमाणे सहाय्यक वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक टंकलेखक यांच्या परीक्षा आता 7,8,9 फेब्रुवारी दिवशी होणार आहेत. नुकतच म्हाडा कडून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 29,30 जानेवारीला राज्यात एमपीएससीच्या परीक्षा (MPSC Exams) देखील होत असल्याने म्हाडाकडून त्यांच्या 29,30 जानेवारीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारीच्या परीक्षा पूर्वी प्रमाणे जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे.
एमपीएससी च्या नव्या वेळापत्रकाप्रमाणे 2 जानेवारीला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आता 23 जानेवारी 2022 दिवशी होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 आता 29 जानेवारी 2022 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 पेपर क्रमांक 2 पोलिस उपनिरीक्षक आता 30 जानेवारी 2022 ला होणार आहे. या परीक्षांचा परिणाम म्हाडाच्या परीक्षांवर झाला आहे. इथे पहा म्हाडा परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक .
म्हाडा कडून 7,8,9 फेब्रुवारी 2022 दिवशी आयोजित परीक्षा सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि 4 ते 6 अशा सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही दिवशी तीन सत्रांमध्ये होणार आहेत.
म्हाडा (MHADA) कडून रविवार 12 डिसेंबर ला मुंबईत 500 हून अधिक विविध पदांच्या भरतीसाठी होणारी परीक्षा पेपर फुटल्यान रद्द करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून अधिक तपास सुरू असून संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे.