MHADA Admit Card 2021-2022: म्हाडा परीक्षेसाठी हॉलतिकीट्स जारी; mhada.gov.in वरून अशी करा डाऊनलोड
म्हाडा (Photo Credits-Facebook)

म्हाडा कडून सरळसेवा पद्धतीने विविध 565 जागांवर होणार्‍या परीक्षांसाठी हॉलतिकीट जारी करण्यात आले आहे. ही परीक्षा काही महिन्यांपूर्वी पेपरफूटी प्रकरणामुळे अचानक रद्द करत लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र नव्या वेळापत्रकानुसार आता 31 जानेवारीपासून ही परीक्षा घेतली जाणार आहे त्याची हॉलतिकीट्स जारी करण्यात आली आहेत.

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 जागा, उप अभियंता (स्थापत्य) 13 जागा, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी 02 जागा, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 जागा, सहायक विधी सल्लागार 2 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 जागा , कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक 6 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 44 जागा, सहायक 14 जागा, वरिष्ठ लिपीक 73 जागा, कनिष्ठ लिपीक- टंकलेखक 207 जागा, लघूटंकलेखक 20 जागा, भूमापक 11 जागा आणि अनुरेखक 07 अशा एकूण 565 जागांवर नोकरभरती होणार आहे.

कसं डाऊनलोड कराल हॉल तिकीट?

  • म्हाडाची ऑफिशिअल वेबसाईट mhada.gov.in ला भेट द्या.
  • त्यानंतर होमपेजवर दिसणार्‍या ‘CLICK HERE FOR MHADA RECRUITMENT 2021 HALL TICKET'या लिंकवर क्लिक करा.
  • आता एक नवी विंडो ओपन होईल त्यावर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाका.
  • आता म्हाडाचं हॉलतिकीट तुम्ही डाऊनलोड करून ठेवू शकता. त्याची प्रिंट आऊट देखील काढू शकता.

म्हाडा कडून 31 जानेवारी, 1, 2, 3, 7 , 8 ,9 फेब्रुवारी या सात दिवशी परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. म्हाडाच्या वेबसाईटवर परीक्षांनुसार कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे याचे सविस्तर वेळापत्रक तुम्ही पाहू शकता.  म्हाडाची सरळसेवा भरती परीक्षा आता TCS कडून घेतली जाणार आहे.