Layoffs Representative Image (Photo Credit: Pixabay)

फेसबुक (Facebook) या लोकप्रिय सोशल मीडिया मंचाची मातृत्व कंपनी मेटा (Meta) कर्मचारी कपातीची (Meta Layoffs) पुन्हा एकदा नव्याने योजना आखत आहे. ज्यामध्ये आणखी काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले जाणार आहे. द वॉल स्ट्रीट जर्नल (WSJ) चा हवाला देत वृत्तसंस्था आयएनएसने याबाबत वृत्त दिले आहे. पुढच्या काही काळामध्ये मेटा कंपनी आपल्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करेल. कर्मचारी कपातीची ही योजना पुढच्या अनेक फेऱ्यांमध्ये केली जाईल. ज्यात सुमारे 13% कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येईल. म्हणजेच हे प्रमाण पाठीमागील वर्षाइतकेच असेल.

द वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटल्याप्रमाणे, कर्मचारी कपातीची प्रक्रीया पुढच्या आठवड्यापासून सुरु होईल. ज्यात अभियांत्रीकी विभागेत्तर (नॉन अभियांत्रिकी) कर्मचाऱ्यांचा प्रथम समावेश असेल. कर्मचारी कपातीसोबतच मेटा आपले कार्यालयीन काही विभागही बंद करण्याच्या मनस्थितीत आहे. पाठिमागच्या वर्षी मेटाने सुमारे 13% म्हणजेच 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले. यंदाही त्याची पनरावृत्ती होणार असल्याचे सांगितले जात आहे. मेटा ज्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार आहे त्यात रिअॅलिटी लॅब्स, मेटाच्या हार्डवेअर आणि मेटाव्हर्स डिव्हिजन अशा विभागांचा समावेश आहे. (हेही वाचा, Meta Paid Blue Badge Service: आता Facebook आणि Instagram ब्लू टिकसाठी दरमहा द्यावे लागतील पैसे; ट्विटरनंतर मेटाने सुरू केली सशुल्क सेवा)

दरम्यान, द वॉल स्ट्रीट जर्नलने नियोजित कपातीचा अहवाल दिल्यानंतर तासांनंतरच्या ट्रेडिंगमध्ये मेटा शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक वाढले. मेटा मुख्य कार्यकारी मार्क झुकरबर्ग यांनी पूर्वी सांगितले होते की 2023 हे मेटामध्ये "कार्यक्षमतेचे वर्ष" असेल आणि काही प्रकल्प कंपनी बंद करेल.

काय आहे फेसबुक?

Facebook ही एक सोशल नेटवर्किंग वेबसाइट आहे. जी 2004 मध्ये मार्क झुकरबर्गने स्थापन केली होती. 2021 पर्यंत 2.9 अब्ज पेक्षा जास्त मासिक सक्रिय वापरकर्ते असलेले हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.

Facebook वापरकर्त्यांना वैयक्तिक प्रोफाइल तयार करण्यास, मित्र आणि कुटुंबाशी कनेक्ट करण्याची, फोटो आणि व्हिडिओ सामायिक करण्याची आणि खाजगी संदेश किंवा सार्वजनिक पोस्टद्वारे संप्रेषण करण्याची सेवा उपलब्ध करुन देते. वापरकर्ते देखील सामील होऊ शकतात किंवा स्वारस्य-आधारित गट तयार करू शकतात, कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकतात आणि त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटी, व्यवसाय किंवा संस्थांच्या पृष्ठांचे अनुसरण करू शकतात. त्याच्या सोशल नेटवर्किंग वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, Facebook व्यवसाय आणि संस्थांना जाहिरात सेवा देखील देते.