Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

मुंबईकरांनो (Mumbai) उद्या घराबाहेर पडण्याच्या विचारात असाल आणि लोकलने प्रवास (Local) करायचं ठरवलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी. गणेशोत्सवा (Ganeshotsav) दरम्यान मुंबईकरांना मेगाब्लॉक (Mumbai Mega Block) पासून बऱ्यापैकी सुट्टी मिळाली होती पण आता उद्या मुंबईतील (Mumbai) तिन्ही मार्गावर लोकल मार्गावर मेगाब्लॉक (Local Mega Block) असण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे (Western Railway), मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वेकडून (Harbour Railway) रविवारी मेगाब्लॉक (Megblock) दरम्यान विशेष वेळापत्रक (Time Table) जारी करण्यात आलं आहे. रेल्वे रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा दुरुस्ती ओव्हरहेड वायर यांसारख्या विविध कामांसाठी लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तरी मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. रस्ते वाहतूकीवर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यात उद्या मेगाब्लॉक असल्याने रस्त्या ऐवजी रेल्वे मार्गाचा वापर करणार असाल तर वेळापत्रक जाणून घ्या.

 

उद्या पश्चिम रेल्वे (Western Railway) कडून मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. चर्चगेट (Churchgate) ते मुंबई सेंट्रल (Mumbai Central)  या स्थानकांदरम्यान जलद मार्गावर तब्बल पाच तासांचा मेगाब्लॉक (Megblock) असणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान हा जंम्बो मेगाब्लॉक (Jumbo Megablock) पश्चिम रेल्वे कडून घेण्यात आला आहे. दरम्यान जलद मार्गावरील लोकल (Local) फेऱ्या धीम्या मार्गावरून धावणार आहेत. तर काही लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असुन काही लोकल ट्रेन (Local Train) उशीरा धावत आहेत. मध्य रेल्वे (Central Railway) कडूनही मेगाब्लॉक (Megablock) संबंधी विशेष सुचना जाहीर करण्यात आल्या आहेत. (हे ही वाचा:- Marathwada Mukti Sangram Din: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण, मराठवाड्यासंबंधी मोठी घोषणा)

 

मध्य रेल्वेवरील (Central Railway) जलद मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार (Vidyavihar) या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात आला आहे. सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या दरम्यान हा मेगाब्ल़ॉक (Megablock) घेण्यात आला आहे. या पाच तासात धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. तसेच ट्रान्स हार्बर (Trans Harbour) मार्गावर ठाणे ते वाशी (Vashi)-नेरूळ (Nerul)-पनवेलदरम्यान (Panvel) धावणाऱ्या अप (Up) आणि डाऊन (Down) लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. या वेळेत नवी मुंबईतील (Navi Mumbai) प्रवाशांना मुख्य हार्बर मार्गावरून प्रवास करता येणार आहे.