Mumbai Local Mega Block Update: कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर मुंबई लोकल (Mumbai Local) केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. मात्र, अनेक चाकरमानी रेल्वेचा प्रवास करत आहेत. अशात आता रविवारी रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम मार्गांवर मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. रविवारी 24 जानेवारीला मुंबई मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येईल. तसेच पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे रुळांच्या देखरेखीसाठी आणि दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेतला जाणार आहे. जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच रेल्वेच्या पश्चिम मार्गावर अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सांताक्रूझ ते गोरोगाव दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. (वाचा - दिलासादायक! Bird Flu मुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाकडून मदतीचा हात; अंडी व पक्षीखाद्याच्या नुकसान भरपाईसाठी 1.30 कोटी मंजूर)
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात ते आठ महिन्यांपासून लोकलसेवा बंद आहे. सर्वसामान्यांनासाठी लोकल सेवा खुली करण्यासाठी राज्य सरकारने रेल्वेला प्रस्ताव दिला होता. परंतु, तो प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकलचे दार कधी उघडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.