The Quint या वेबसाईटने हॉस्पिटल्समधील गैरसोयीबद्दल एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये NSCI Dome दाखवण्यात आले असून त्याला मुलुंड सेंटर (Mulund Centre) म्हणण्यात आले होते. दरम्यान ही माहिती चुकीची असल्याने कोणतीही बातमी देण्यापूर्वी/छापण्यापूर्वी त्यामागील सत्य पडताळून पाहावे, असे मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) मीडिया पोर्टल्सना (Media Portals) सांगितले आहे. तसंच चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही BMC ने दिला आहे.
यासंबंधित मुंबई महानगरपालिकेने ट्विट केले आहे. यात BMC ने म्हटले, "प्रिय The Quint, चुकीची आणि पडताळणी न केलेली माहिती हा ही एक प्रकारचा मोठा व्हायरस असून तो दुप्पट वेगाने पसरला जातो. तुम्ही जारी केलेल्या व्हिडिओमध्ये ज्याला मुलुंड सेंटर म्हणत आहात ते NCSI Dome DCHC आहे. ज्याची क्षमता 500 बेड इतकी आहे. चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल."
तसंच मुलुंड सेंटरचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही अशी माहिती बीएमसीने दुसऱ्या ट्विटद्वारे दिली आहे. त्याचबरोबर कोणत्याही माहिती मिळवण्यासाठी किंवा शंकेचे निरसन करण्यासाठी BMC शी संपर्क साधावा असेही यात म्हटले आहे. (Coronavirus: मुंबईत होणाऱ्या कोरोना व्हायरस चाचण्यांची संख्या देशात सर्वाधिक- मुंबई महापालिका)
BMC Tweet:
2/2 The Mulund centre is still being worked on. Please feel free to reach out to us for information or any queries or concern.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 6, 2020
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 80000 च्या पुढे गेला आहे. तर शुक्रवारी आलेल्या अपडेटनुसार, मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 45,854 इतकी झाली आहे. तर एकूण 1,518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थोपवण्याच्या दृष्टीने राज्य सरकार नवे निर्णय घेत आहे. आता महाराष्ट्र सरकार Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.