Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. दरम्यान कोविड-19 (Covid-19) च्या उपचारासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. कोरोना व्हायरसच्या उपचारात याचे सकारात्मक परिणाम होऊ शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) सुचविले आहे. तसंच MERS- CoV आणि SARS या कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या आजारात या औषधाचे आशादायी परिणाम दिसून आल्याचे प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हे औषध अत्यंत महान असल्याने गरिबांच्या सोयीसाठी राज्य सरकार याची खरेदी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचा संसर्ग थोपवण्यासाठी राज्य सरकार सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असून कोविड-19 च्या रुग्णांसाठी क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आली असून कोविड-19 च्या चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसंच यापूर्वी राज्यात कोविड-19 च्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करण्यात आला होता. (Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? जाणून घ्या राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी)

Rajesh Tope Tweet:

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 80229 इतकी झाली असून 2849 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. राज्यातील 42215 रुग्णांवर उपचार सुरु असून 35147 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. विशेष म्हणजे रुग्णसंख्येत दर दिवशी मोठी भर पडत आहे. दरम्यान राज्यात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु असून अनेक बाबतीत मुभा देण्यात आली आहे.