Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मुंबई महानगर पालिकेमध्ये सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), गृहस्थ औषध (Houseman Medicine) या पदांसाठी भरतीसाठी बीएमसीकडून (BMC) एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणार्‍यांसाठी ही एक चांगली संधी आहे. दरम्यान या दोन्ही पदांसाठी स्वतंत्र नोटिफिकेशन जारी करण्यात आल्याने त्यांची पात्रता निकष, वयोमर्यादा, पगार आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत वेगवेगळी आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मुंबई मध्ये 14 आणि गृहस्थ - औषध पदासाठी मुंबई मध्ये 9 पदांवर भरती होणार आहे.

सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराला किमान एका वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराने MD/MS/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तर 1,00,000/- रुपये प्रतिमहिना पगार त्याला मिळणार आहे. उमेदवाराला आपला अर्ज डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई - 400008 इथे पाठवावा लागणार आहे. इथे पाहा सविस्तर नोटिफिकेशन.

गृहस्थ - औषध या पदासाठी अर्ज करणार्‍यांना MBBS पर्यंत शिक्षणाची मर्यादा आहे. त्यांनाही संबंधित पदाचा किमान एक वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवारा 27,000/- रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे. वैद्यकीय अधीक्षक, संसर्गजन्य रोगांसाठी कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, मुंबई-400011 या पत्त्यावर त्यांना अर्ज करावा लागणार आहे. पाहा सविस्तर नोटिफिकेशन.

दरम्यान मुलाखतीसाठी जाताना उमेदवाराकडे बायोडेटा,दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, पासपोर्ट साईझ फोटो आणि वैध ओळखपत्र सादर करणं आवश्यक आहे.