भायखळाच्या राणी बाग बंगल्यात राहण्याचा महापौरांचा निर्णय निश्चित
महापौर विश्वनाथ महाडेश्वर (फोटो सौजन्य- फेसबुक)

मुंबईचे महापौर श्री विश्वनाथ महाडेश्वर राहत असलेल्या महापौर बंगल्याचा निर्णय अखेर जाहिर झाला आहे. या ऐतिहासिक बंगल्यात राहणाऱ्या महापौरांनी आता भायखळाच्या राणी बागेत असेलल्या बंगल्यात राहण्याचे ठरविले आहे. तसेच मंगळवारी झालेल्या एका सभेत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे.

दादरच्या शिवाजी पार्क जवळ असलेला महापौर बंगल्याला ऐतिहासिक वास्तूचा दर्जा दिला जातो. तसेच शिवाजी पार्कसारख्या शांतता क्षेत्रात हा महोपौरांचा बंगला येतो. तर हिंदू हृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे स्मृती स्मारक दादर येथील बंगल्यात आता महापौरांना राहायचे नसून त्यांनी भायखळा राणी बागेतील बंगल्यात राहण्याचे ठरविले आहे. या संदर्भात त्यांनी घेतलेल्या सभेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि पालिका उपाधिकारी अजॉय मेहता यांनी उपस्थिती लावली होती. तसेच राणी बागेच्या बंगल्यामध्ये सध्या अजॉय मेहता राहत आहेत. तसेच या बंगल्याची डागडुजी करावी लागणार  असून त्याचा सर्व खर्च महापालिका करणार असल्याचे महापौरांनी सांगितले आहे.

मात्र यापूर्वी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी राणी बागेतील बंगल्यात राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता त्यांनी आपल्या शब्दावर कायम न राहता अखेर भायखळाच्या राणी बागेतील बंगल्यात राहण्यास होकार दिल्याचे स्पष्ट केले आहे.