Shiv Sena on NCP: म्हैस पाण्यात सौदा बाजारात, पार्थ पवार यांच्यावरुन संभ्रम; शिवसेनेचा राष्ट्रवादीला थेट इशारा
Shrirang Barne | (Photo Credit: Facebook )

लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवधी आहे. तोवरच मावळ लोकसभा (Maval Lok Sabha constituency) मतदारसंघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) 'सामना' सुरु झाल्याचे चित्र आहे. निमित्त ठरले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री पार्थ पवार (Parth Pawar) यांचे. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना (Shiv Sena) असा सामना रंगला. यात शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी मुसंडी मारत राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांचा पराभव केला. राष्ट्रवादीसाठी हा पराभव म्हणजे मोठा धक्का होता. आता लोकसभा निवडणूक 2024 डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी आगामी लोकसभेला हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडला जावा अशी मागणी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. त्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच अवधी असल्याने ही चर्चा म्हणजे 'म्हैस पाण्यात आणि सौदा बाजारात' अशी असल्याचे मतदारसंघातील नागरिक म्हणत आहेत.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यातून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त शिवसेनेचे अनेक नेते आज विदर्भ आणि मराठवाड्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, मावळ येथील शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांना जालना दौऱ्यात पत्रकारांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा डोळा असल्याबद्दल तसेच, एका कार्यकर्त्याने फेसबुक पोस्ट टाकल्याबद्दल विचारले. यावर बोलताना श्रीरंग बारणे यांनी म्हटले की, नेमकी कोणत्या कार्यकर्त्याने ही पोस्ट टाकली याबातब मला माहती नाही. निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा अवधी आहे. त्यामुळे आताच याबाबत अशा पोस्ट टाकून काही मंडळी संभ्रमावस्था निर्माण करतात. पण, आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की, त्यांचा बोलवता धनी कोण वेगळा आहे का? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे, असे बारणे म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut on Anil Deshmukh Resign: अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणं ही चूक होती, शिवसेना खासदर संजय राऊत यांचे वक्तव्य)

ट्विट

संजय राऊत यांचीही स्पष्ट भूमिका

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी शिवसेना खासदा संजय राऊत यांनाही याबाबत विचारले. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, कधी कधी एखादा कार्यकर्ता भावनेच्या भरात बोलतो. त्यामुळे त्यावर आपण पक्ष म्हणून अधिकृत भूमिका कशी मांडणार. मावळमध्ये आमचा खासदार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून अशी काही अधिकृत मागणी आली तर आम्ही त्यांच्या नेत्यांशी चर्चा करु. पार्थ पवार हे तरुण कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भविष्याबाबत त्यांचा पक्ष विचार करेन, असेही संजय राऊत म्हणाले.