Sharad Pawar, Parth Pawar, Ajit Pawar | (Photo credit: archived, edited, symbolic images)

शरद पवार (Sharad Pawar) यांचा नातू पार्थ पवार (Parth Pawar) मावळ मतदारसंघातून पराभूत झाला आहे. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांचा विजय झाला आहे. श्रीरंग बारणे हे या मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत. पार्थ पवार यांचा 2 लाख मतांनी पराभव झाला आहे. पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहे. महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल: रायगड लोकसभा मतदारसंघातून NCP चे सुनील तटकरे विजयी; अनंत गीते पराभूत

श्रीरंग बारणे यांना 4 लाख मतं तर पार्थ पवारला 1 लाख 50 हजार मतं मिळाली आहेत. मात्र बारणेंनी पार्थवर विजय मिळवत एनसीपीला धक्का दिला आहे. शरद पवारांनी  'माढा' लोकसभा मतदार संघातून माघार घेत अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार निवडणूकीच्या रिंगणात उतरलं होतं. भाजपाच्या कांचल कूल यांच्यावर मात करत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे मात विजयी ठरल्या आहेत.

महाराष्ट्रात 48 मतदारसंघांमध्ये काय आहेत निकाल? 

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये देशात 542 जागांवर मतदान झाले आहे. तर महाराषष्ट्रात 48 जागांवर मतदान झाले आहे. सध्या कल हातामध्ये आले आहेत. पुढील काही तासातच निकाल स्पष्ट होणार आहेत.