Uddhav Thackeray, Rajbhavan, Sharad Pawar (Photo Credits: PTI)

Government Formation in Maharashtra: अखेर महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू झालीच. महाराष्ट्रात कोणताही राजकीय पक्ष सत्ता स्थापन न करू शकल्यामुळे हा निर्णय राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी घेतल्याने काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या घडामोडींची गती थंडावली.

परंतु या सर्व घडामोडींमध्ये काही राजकीय ठिकाणे प्रकर्षाने गाजली. त्यातील पाहिले ठिकाण म्हणजे मातोश्री.  शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान म्हणजे 'मातोश्री' (Matoshree Bunglow) . निवडणुकीच्या निकालानंतरची शिवसेनेने त्यांची सर्व सूत्र ही इथून हलवली. त्यामुळे मातोश्री हे शिवसेनेच्या राजकारणातील एक महत्त्वाचं ठिकाण. इथूनच शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची मागणी केली व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी फोनवरून चर्चा केली.

दुसरं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे सिल्वर ओक (Silver Oak Bunglow), जे आहे शरद पवार यांचं निवासस्थान. या ठिकाणीही अनेक महत्त्वाच्या राजकीय भेटी झाल्या. संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटी इथेच व्हायच्या आणि अखेरीस राष्ट्रवादी शिवसेनेला मदत करण्याची शक्यताही या भेटीनंतरच निर्माण झाली. तसेच  या बंगल्यावरूनच राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना संदेश पोहोचवला जात असे.

तर प्रामुख्याने ऐकायला मिळालेलं आणखी एक ठिकाण होतं वाय. बी. चव्हाण सेंटर. मंत्रालयाच्या अगदी जवळ असणाऱ्या या ठिकांणांवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठका झाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील चर्चा सुद्धा इथेच झाल्या आहेत.

या सर्वांमधील अधिक  महत्त्वाचं ठिकाण होतं ते म्हणजे राजभवन. हे म्हणजे राज्याच्या राज्यपालांचं शासकीय निवासस्थान. इथे तीन लीडिंग पक्षांना राज्यपालांनी बोलावून सत्ता स्थापनेची संधी दिली होती. भाजपने सर्वात प्रथम राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेस पक्ष असमर्थ असल्याचा निर्णय इथेच सांगितला होता. त्यानंतर शिवसेनेने राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेसाठी आणखी काही कालावधी द्यावा अशी विनंती केली होती. पण ती फेटाळत शेवटी राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेची संधी दिली.

महाराष्ट्र ही जुगारावर लावण्याची ‘चीज’ नाही; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले

पण या सर्वात अंडररेटेड ठरलं ते म्हणजे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान. कारण वर्षा बंगल्याचं (Varsha Bunglow) नाव तसे माध्यमांसमोर प्रकर्षाने आलं नाही. कारण भाजपने सत्ता स्थापनेला नकार देत फक्त वेट अँड वॉच ची भूमिका घेतली होती.