Farmers | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

मराठवाड्यात (Marathwada) यंदा पावसाने दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, शेतकरी संकटात सापडला आहे. अशा परिस्थीतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या (Farmer Suicide) प्रमाणात देखील मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल 865 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली आहे. महत्त्वाचे म्हणजे दिवसाकाठी 2 ते 3 शेतकरी आत्महत्या होत आहेत तरी देखील सरकारने अद्याप याबाबत कोणतीच दखल घेतलेली नाही आहे.  सर्वाधिक शेतकरी आत्महत्या कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बीड (Beed) जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.  (हेही वाचा - Pune Shocker: कोपर्डी बकात्कार,हत्या प्रकरणातील आरोपीची येरवडा जेलमध्ये गळफास घेत आत्महत्या)

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे जेव्हा विराजमान झाले होते तेव्हा  सर्वात आधी राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी माझा पहिला प्रयत्न असणार असल्याचा दावा केला होता. पंरतू त्यांचा हा दावा सपशेल फोल ठरला आहे. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही आहे. कर्जबाजारीपणा तसेच नापिकी, आर्थिक परिस्थिती अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी आत्महत्या करत आहेत. मराठवाड्यात गेल्या आठ महिन्यांत म्हणजेच 1 जानेवारीपासून ते 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील तब्बल 685 शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपले जीवन संपवले आहे.

गेल्यावर्षी म्हणजेच 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या काळात मराठवाड्यात 1 हजार 22 शेतकरी आत्महत्येची नोंद झाली होती. असे असताना यावर्षी आठ महिन्यातच 685 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच मराठवाड्यातील आत्महत्यांचा हा वेग चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.