Suicide | (Photo Credits: unsplash.com)

कोपर्डी हत्याप्रकरणातील (Kopardi Murder Case) आरोपीने पुण्यातील येरवडा कारागृहात (Pune Yeravda Jail) आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. आज (10 सप्टेंबर) च्या पहाटेची ही घटना आहे. आरोपी जितेंद्र (Jitendra) उर्फ पप्पू शिंदे (Pappu Shinde) याने गळफास घेतला आहे. स्वतः च्या कपड्यांनीच त्याने गळफास घेतला. दरम्यान या खळबळजनक प्रकाराची माहिती मिळताच तातडीने अधिकारी तेथे पोहचले. पप्पू शिंदे याचा मृतदेह मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला असून तिथे त्याचं शवविच्छेदन केले जाणार आहे.

अहमदनगरच्या कोपर्डी मध्ये 2016 मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिथी हत्या झाली होती. या प्रकरणाने महाराष्ट्र संतप्त झाला होता. पोलिसांनी या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. नक्की वाचा: मराठा समाजाला न्याय हवा आहे, आश्वासन नको, असे सांगत खासदार संभाजीराजे भोसले यांनी कोपर्डी प्रकरणावरही केले भाष्य .

नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ यांच्यावर न्यायालयाच्या जुन्या इमारत परिसरात दोनदा हल्ला झाला होता तर नव्या इमारती मध्येही सशस्त्र हल्ला झाला होता. आरोपींना 2017 साली अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत त्यांना शिक्षा सुनावली होती.