Chhatrapati Sambhajiraje on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. गेल्या आठवड्यापासून ते पुन्हा जालना येथील आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. परिणामी, त्यांची तब्येत खावात चालली आहे. त्यांनी उपचार घेण्यासही मनाई केली आहे. दरम्यान आज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje )यांनी उपोषणस्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांची विचारपूस केली. त्यावर प्रतिक्रीया देत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद देखील साधला. सरकारला खडे बोलही सुनावले. (हेही वाचा:Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिले ही शासनाची भूमिका, विकासाच्या प्रश्नांबाबत काढला जातोय चर्चेतून मार्ग- Devendra Fadnavis )
छत्रपती संभाजीराजे यांनी त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. ‘विशेष अधिवेशन घ्या अशी जरांगे यांची मागणी आहे. होऊन जाऊ द्या समोरासमोर असे संभाजी राजे म्हणाले. शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना न्याय दिला. शाहू महाराजांनी मराठ्यांसह सर्वांना न्याय दिला. त्यामुळे तुम्हीही मराठ्यांना न्याय द्या’ अशी मागणी संभाजी राजेंनी केली.
गेल्या आठवड्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषणावर आहेत. त्यामुळे आता त्यांची तब्येत खालावली असून त्यांनी सलाईन लावू घेण्यासही नकार दिला आहे. याच मुद्यावरून बोलताना संभाजी राजे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. 'आम्ही भरपूर त्रास सहन केला आहे. आता यापुढे नाही चालणार. माझी जरांगेंना साथ आहे. आताही आहे. यापुढेही असणार. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माझी सूचना आहे की, तुम्ही मेडिकल रिपोर्ट घ्या. परिस्थिती पाहा. उद्या काही झालं तर सरकार आणि विरोधी पक्ष जबाबदार असेल’ असा इशाराच त्यांनी दिला.
सरकारला इशारा
मागच्यावेळी मी जरांगेंना पाणी प्या म्हटलं होतं. त्यांनी माझी विनंती मान्य केली होती. पण आता मी त्यांना म्हणणार नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. पण तब्येतीचा धोका होईल असं त्यांनी काही करू नये’ असा सल्ला त्यांनी दिला. ‘सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी किंवा समाजाची बाजू मांडण्यासाठी म्हणा, मी त्यांना पाणी घ्या म्हणणार नाही. अनेकांनी सांगितलं राजे तुम्ही सांगा तुमचा शब्द पाळतील. पण हे सरकार आंदोलन गुंडाळण्यास बसले आहेतच. आंदोलन व्हावे ही अनेकांची इच्छा नव्हती. हा शेवटचा लढा आहे, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.