MBBS Admission 2019: मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात 12 % आरक्षण मंजूर झाल्यानंतर आता ते यंदाच्या प्रवेशप्रक्रियेमध्येही लागू करण्यात आले आहे. एमबीबीएसच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) आव्हान देणारी याचिका आज (11 जुलै) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई: सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सचा आरक्षणाविरोधात निषेध; गुणवत्तेवर आरक्षण देण्याची मागणी
एमबीबीएसच्या प्रवेशासाठी यंदापासून आरक्षण कायदा लागू करण्यात आला आहे. प्रवेशप्रक्रिया आरक्षणाचा कायदा पारित होण्याआधीपासून सुरू झाली असली तरीही आरक्षण हे प्रवेश देताना लागू होणार आहे. असा दावा राज्य सरकारने केला असून न्यायालयाने तो स्वीकारला आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 12% आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने डिसेंबर 2018 मध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण दिले होते. मात्र त्याला न्यायालयात देण्यात आलेल्या आव्हानानंतर बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला शिक्षणामध्ये 12% आणि नोकरीमध्ये 13% आरक्षण दिले आहे.