Reservation | (Photo credit: archived, edited, symbolic images)

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मराठा आरक्षणाबाबतची (Maratha Reservation Hearing Update) सुनावणी उद्या म्हणजेच 20 जानेवारीला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणार आहे. ही सुनावणी 25 जानेवारीला होणार होती. मात्र आता हे प्रकरण उद्याच लिस्ट झाले आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहेत. त्यात विद्यार्थ्यांच्या अॅडमिशन प्रक्रिया देखील रखडल्या आहेत. तर काही सुरुवात होतील. अशा परिस्थितीत मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय लवकरात लवकर व्हावा अशी मागणी जोर धरू लागली होती.

मागील महिन्यात 9 डिसेंबरला मराठा आरक्षणावरची स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाने तूर्तास नकार दिला असून पुढील सुनावणीपर्यंत ही स्थगिती कायम राहणार असल्याचे सांगितले होते. यावेळी अनेकांची निराशा झाली होती आणि मराठा समाजामधून नाराजीचा सूर उमटत होता. त्यात स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला देखील परवानगी नाही असेही सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर ही सुनावणी 25 जानेवारीला होणार होती. मात्र ती आता उद्याच लिस्ट करण्यात आली आहे. उद्या यावर अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. यावेळी घटनापीठ थेट मूळ प्रकरणाची सुनावणी करणार आहे.

हेदेखील वाचा- MP Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation: मराठा आरक्षण मुद्द्यावर महाराष्ट्र राज्य सरकार हतबल- खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापले आहे. मराठा समाज मोर्चे, परिषदा, बैठका, आंदोलने आदींच्या माध्यमातून राज्य सरकारचे लक्ष वेधू इच्छित आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजातूनही मराठा समाजाला आरक्षण द्या परंतू, आमच्या कोठ्याला धक्का लावू नका अशी मागणी जोर धरत आहे.