मराठा आरक्षणाविरुद्ध वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratan Sadavarte) यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र याचिकेला 23 जानेवारी 2019 पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत 23 जानेवारीपर्यंत राज्यात मेगाभरती करणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिले आहे. (हे ही वाचा: महाराष्ट्र राज्य नोकरभरती : 72 हजार पदे, जाणून घ्या कोणत्या विभागात किती जागा?)
Bombay High Court adjourns Maratha reservation matter till January 23, 2019
Read @ANI story | https://t.co/eiPKkyeJb6 pic.twitter.com/opJo2FYwAP
— ANI Digital (@ani_digital) December 19, 2018
महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16% आरक्षण जाहीर केले होते. मात्र मराठा समाज्याचा आरक्षणाविरुद्ध याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घटनाबाह्य आहे. घटनेनुसार 50% हून अधिक आरक्षण देता येत नसल्याने आरक्षण रद्द करण्यात यावे, असे आव्हान याचिकेत म्हटले होते.