Manoj jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणात सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांचे गेल्या 3 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यातच आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. (हेही वाचा:Manoj Jarange Patil SIT Enquiry: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी; राज्य सरकारचा निर्णय )
सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या या उपोषणाचा मंगळवारी चौथा दिवस असून जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचे दिसत आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. pic.twitter.com/GgSsx02JdZ
— SaamTV News (@saamTVnews) June 11, 2024
'आमरण उपोषण सुरू आहे तरी सरकार जाणूनबुजून बैठका घेत आहे. सरकारला काळजी असती तर त्यांनी दखल घेतली असती. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. त्यांना मराठे चांगला हिसका दाखवतील,' असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. यादरम्यान, त्यांनी छगळ भुजबळ यांच्यावरही टिका केली.