मुंबई (Mumbai) मधील कुर्ला (Kurla) येथील पादचारी पुलावर (Pedestrian Bridge) एका व्यक्तीवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, या हल्ल्यातून ती व्यक्ती बचावली आहे. मात्र ही घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा प्रसंग 28 नोव्हेंबर रोजी घडला. हा हल्ला पैसे उकळण्यासाठी नाही तर व्यक्तीला ठार मारण्यासाठी किंवा जखमी करण्यासाठी झाला असल्याचे पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. (Bengaluru: 24 हजार रुपयांचे भाडे न मिळल्याने महिलेकडून भाडेकरुवर चाकू हल्ला)
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, पादचारी पुलावरुन चालत असलेल्या एका व्यक्तीच्या मागून एक इसम योतो आणि चाकू हल््याचा प्रयत्न करतो. मात्र त्यांच्यात झटापट उडते. त्यानंतर हल्ला करणारी व्यक्ती तेथून पळ काढते. तर हल्ला होणारा इसमही तेथून निघून जातो. मात्र या सर्व प्रसंगात आजूबाजूचे लोक मात्र चांगलेच बिथरतात. काहींना नेमके काय सुरु आहे, हे कळतच नाही. ते जाणून घेण्यासाठी प्रसंग पाहत काहीजण उभे राहतात. तर काहीजण प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत तेथून काढता पाय घेतात.
ANI Tweet:
#WATCH | Man survives knife attack, on a pedestrian bridge in the Kurla area in Mumbai, Maharashtra (28.11.2020)
"There was no attempt by the attacker to appropriate any money. It only seems to be an attack with an intent to cause grievous injury or death," says a police officer pic.twitter.com/xjhOEjQPuB
— ANI (@ANI) December 2, 2020
दरम्यान, या हल्लामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र दिवसाढवळ्या अशा प्रकराचे हल्ले होणे गंभीर आहे. गेल्या वर्षी गाजियाबाद येथे अशा प्रकारची धक्कादायक घडली होती. एका डेन्सिस्टने एका महिलेवर चाकूने हल्ला केला आणि तिच्या पाळीव कुत्र्याला पायाने दाबण्याचा प्रयत्न केला. तसंच हल्ले महिखोराने महिलेशी गैरवर्तवणूक करत तिच्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला,