बंगळुरु येथे एका महिलेने कथित रुपात 24 हजार रुपयांच्या भाड्यासाठी भाडेकरुवर चाकू हल्ला केला आहे. महिलेने चाकू हल्लेचा वापर पीडितेच्या हातांवर आणि मानेवर वार करण्यासाठी केला होता. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. पीडितेची ओळख आर पौर्णिमा अशी झाली आहे. पौर्णिमा आणि तिचे पती रविचंद्र यांनी गेल्या वर्षात महालक्ष्मी यांच्या घरी राहण्यासाठी आले होते. आरोपी महिला लगगेरे मधील मारुतिनगर येथील स्थानिक आहे.(Uttar Pradesh Crime: पती तुरुंगात गेल्यानंतर पत्नीचे दीरासोबत जुळले प्रेमसंबंध; 3 वर्षाने जामिनावर सुटून आल्यानंतर मोठ्या भावाची केली हत्या)
पौर्णिमा ही गृहिणी असून तिचा नवरा एका खासगी कंपनीत कार्यकरत आहे. पौर्णिमा आणि तिच्या नवऱ्याने 65 हजार रुपये अॅडवान्स दिले होते. तसेच 6 हजार रुपये घर भाडे सुद्धा देत होते. मात्र कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे रविचंद्र याला आपली नोकरी गमवावी लागली. त्यामुळे त्यांनी चार महिन्यांचे घरभाडे दिले नाही. याच कारणास्तव ती त्रस्त होऊन महालक्ष्मी ही पौर्णिमा हिच्याकडे भाड्याच्या घरात जाऊन कथित रुपात तिच्यासोबत भांडण करण्यास सुरुवात करु लागली.
पौर्णिमा आणि तिच्या नवऱ्याने अजून एक महिना वाट पाहण्यास सांगितली. मात्र घर मालकिणीने या गोष्टीसाठी नकार दिला. महालक्ष्मी हिने पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही असे म्हटले. पौर्णिमा हिने महालक्ष्मी हिला अॅडवान्स पैशांमध्ये कपात करण्यास सांगितली. मात्र मालकिणीने असे म्हटले की, ते पैसे चिड फंटात गुंतवले आहे. तसेच पौर्णिमा हिने मालकिणीला आता सद्यच्या घडीला पैसे देऊ शकत नाही असे म्हटले असता ती संतप्त झाली. यावर आरोपी महिलेने चाकूने डोक्यावर आणि मानेवर हल्ला केला. रविचंद्र हिने बायकोचा बचाव करण्यासह तिला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु ती पळून गेली.(Mathura Boy Kills Father: युट्यूबवर क्राईम पेट्रोलचे व्हिडिओ पाहून एका अल्पवयीन मुलाने केली वडिलांची हत्या; उत्तर प्रदेशातील मथुरा येथील घटना)