
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) चंदौलीमध्ये (Chandauli) गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका व्यक्तीचे गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली होती. याप्रकरणी स्थानिक पोलीस तपास करत होते. मात्र, कोणतेही धागेदोरे त्यांच्या हाती लागत नव्हते. दरम्यान, एका प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीने या हत्येसंदर्भात माहिती देताच पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृताच्या भावानेच त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी तुरुगांत असताना त्याची पत्नी आणि मोठ्या भावात प्रेमसंबंध जुळले होते. यामुळे जामीनावर सुटल्यानंतर आरोपीने मोठ्या भावाला ठार मारले, अशी माहिती समोर येत आहे.
मुकेश यादव असे आरोपीचे नाव आहे. मुकेश हा गेल्या तीन वर्षापूर्वी झालेल्या हत्याकांडप्रकरणी तुरुंगात होता. दरम्यान, मुकेश तुरुंगात असताना त्याची पत्नी आणि त्याचा मोठा भाऊ राकेश यांच्यात प्रेमसंबंध जुळले. काही महिन्यांपूर्वी जामीनावर सुटल्यानंतर मुकेशला त्यांच्या संबंधाबाबत समजले. यामुळे त्याच्या मनात राकेशबद्दल राग होता. दरम्यान, 28 ऑगस्ट रोजी मुकेशने राकेशला दारू पिण्याच्या बहाण्याने गावाबाहेर बोलावले. तो आल्यानंतर गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी मुकेशसह अन्य एका जणाला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- Father Kills Daughter: आई, भावाच्या आठवणीत रडणाऱ्या 4 वर्षाच्या चिमुकलीची निर्दयी बापाकडून हत्या; गाझियाबाद येथील घटना
उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. गेल्या 2 महिन्यांपासून स्थानिक पोलीस वरील घटनेचा तपास करत होते. मात्र, कोणताही पुरावा हाती न लागल्याने पोलीस हतबल झाले होते. मात्र, पोलिसांनी न थांबता चौकशी सुरुच ठेवली. यामुळे या हत्ये गूढ उकलेले.