![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/02/Know-Your-Status-2019-02-27T121810.443-380x214.jpg)
मुंबई: सोसायटीच्या निवडणुकीत झालेल्या किरकोळ वादाचा बदल घेण्यासाठी आपल्या शेजारणीचा मोबाईल नंबर अश्लील जाहिरातींमध्ये टाकणाऱ्या 47 वर्षीय अल्पेश पारेख (Alpesh Parekh) याला नुकतीच पोलिसांनी अटक केली आहे. कस्टम कंपनी मध्ये काम करणारा अल्पेश पारेख हा एका सर्वसामान्य माणसांसारखाच गृहस्थ पण शुल्लक वादातून तयार झालेल्या सूडाच्या भावनेने त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या सोसायटीतल्या महिलांचे नंबर एका जाहिरातीच्या वेबसाईट वर अश्लील संदेश टाकून पोस्ट केल्याचे मुंबई मिररच्या वृत्तानुसार समजत आहे.
अल्पेशच्या सूडाची शिकार झालेल्या 36 वर्षीय पीडित महिलेने नुकतीच बांगूर पोलीस स्थानकात या घटनेची तक्रार नोंदवली होती. काही दिवसांपासून या महिलेला रोज नवीन नंबर वरून कॉल्स आणि मॅसेज येत होते. सुरवातीला काही दिवस दुर्लक्ष केल्यावर एके दिवशी या महिलेने फोन करणाऱ्या व्यक्तीशी बोलण्याचे धाडस केले, त्या व्यक्तीला आपला नंबर कुठे सापडला याची विचारणा करताच त्याने वेबसाईट विषयी माहिती दिली. त्या नंतर या महिलेने ही वेबसाईट पडताळून पाहिल्यावर त्यामध्ये त्यांच्याच इमारतातीतल्या काही आणखी महिलांचे नंबर्स देखील अश्लील मजकुरासह पोस्ट केल्याचे दिसून आले. या महिलांचे पती हे सोसायटीच्या कार्यकारणी कमिटीचे मुख्य पदांवर असल्याने हा केवळ योगायोग नसून यात सोसायटीतल्याच कोणाचा तरी हात असल्याचा संशय या महिलेला आलं.यातूनच त्यांनी थेट पोलिसांकलदे धाव घेत याविषयी तक्रार नोंदवली..मुंबई: ATM मध्ये तरुणीला प्रायव्हेट पार्ट दाखवून आक्षेपार्ह चाळे, व्यक्तीला व्हिडिओच्या माध्यमातून अटक
संबंधित घटनेबाबत पोलिसांचा तपास सुरु असताना सुरवातीला कोणतेच पुरावे हाती लागत नव्हते कारण अल्पेश ने अतिशल चलाखीने आपला आय पी ऍड्रेस किंवा कोणतीही अन्य वैयक्तिक माहिती उघड होणार नाही याची खबरदारी घेतली होती. अखेर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर ज्या ई-मेलवरून जाहिरात पोस्ट करण्यात आली तो आयपी ऍड्रेस मिळवण्यात यश आले असल्याची माहिती डीसीपी अकबर पठाण यांनी दिली. आरोपीला शुक्रवारी सकाळी पोलिसांनी अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात आयपीसी कलम 509 आणि आयटी कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली.