मुंबई: ATM मध्ये तरुणीला प्रायव्हेट पार्ट दाखवून आक्षेपार्ह चाळे, व्यक्तीला व्हिडिओच्या माध्यमातून अटक
मुंबईतील एका एटीएम मध्ये तरुणीला प्रायव्हेट पार्ट दाखवून आक्षेपार्ह चाळे करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील एका एटीएम मध्ये तरुणीला प्रायव्हेट पार्ट दाखवून आक्षेपार्ह चाळे करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुरावा म्हणून तरुणीने या आरोपी व्यक्तीचा व्हिडिओ काढत पोलिसांसमोर सादर केला आहे. त्याच्याच आधारे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे,
शिबानी असे तरुणीचे नाव आहे. शिबानी ही रात्री उशिरा 3 वाजता एटीएममध्ये रिक्षाचालकाला पैसे देण्यासाठी काढायला आली होती. तेथे एक व्यक्ती उपस्थित होती. त्यावेळी या व्यक्तीने शिबानीकडे पाहून त्याच्या शरीराच्या प्रायव्हेट पार्टसोबत आक्षेपार्ह चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच तिला विचित्र पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यक्तीने एटीएममध्ये कॅमेरा असल्याचे पाहिल्यास त्याने प्रायव्हेट पार्ट लपवण्याचा प्रयत्न केला.(मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या)
It's 3 am when I'm typing this. A man just flashed me his dick in a fucking ATM! I had gotten down to withdraw money to pay the Rick and was I was facing problems and this guy offered to pay for it but he kept touching me, inside the ATM! I decided to record him and he... pic.twitter.com/XDlX25iUub
— ☆SHIBANI☆ (@shibxni) May 12, 2019
तर शिबानी हिने या व्यक्तीला अद्दल घडवण्यासाठी या व्यक्तिचा व्हिडिओ शूट केला. तसेच तिच्या सोबत झालेल्या प्रकाराचा खुलासा सोशल मीडियात केला. या प्रकरणी तिने एटीएमच्या बाहेर पोलिसांची गाडी पाहताच तिने त्यांच्याकडे धाव घेत मोबाईल मधील व्हिडिओ पोलिसांना दाखवला. या व्हिडिओमुळे आरोपी व्यक्तीची ओखळ पटणे सोपे झाल्याने अटक केली आहे. मात्र शिबानीने पोस्ट करत असे लिहिले आहे की, येथील परिसर सुरक्षित असल्याचे वाटते. परंतु असे वास्तव्यात काहीच चित्र नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 12, 2019 08:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

