Telangana Floods: तेलंगणातील नागरकुर्नुल जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आला. या पूरातून एका माणूस बुडणारचं होता तेवढ्यात दोन शौर्यवान पोलिसांनी त्याला वाचवले आहे. या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. (हेही वाचा- बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; नद्यांवरील पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला)
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणासह दक्षिण भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. १ सप्टेंबर रोजी तेलंगणातील नागरकुर्नुल जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यात एक माणून बुडत होते. ते पाहून दोन पोलिसांनी स्वत: च्या जीवाचा विचार न करता बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवले. एकाने ही घटना फोनमध्ये कैद केली. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, दोन पोलिस कर्मचारी एका व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुराच्या पाण्यातून जाताना दोघांन्ही काळजीपूर्वक हात धरून बचाव कार्य केले.
पोलिसांकडून बचावकार्य
నాగర్ కర్నూల్ నాగనూల్ వాగులో ఓ వ్యక్తి కొట్టుకుపోతుండగా తక్షణమే స్పందించి ధైర్య సాహసాలతో ప్రాణాలకు తెగించి కాపాడిన హెడ్ కానిస్టేబుల్ తకీయొద్దీన్, కానిస్టేబుల్ రాములను జిల్లా ఎస్పీ, గౌరవ డిజిపి శ్రీ డా.జితేందర్, ఐపీఎస్ అభినందించారు.#TelanganaPolice pic.twitter.com/Q6cfVseWbf
— Telangana Police (@TelanganaCOPs) September 1, 2024
तेलंगणाचे पोलिस महासंचालक डीजीपी जितेंद्र आणि पोलिस अधीक्षक यांनी वैयक्तिकरित्या या कॉन्स्टेबलचे कौतुक केले आहे. या धाडसी वृत्तीला सर्वींकडून प्रशंसा मिळत आहे. व्हायरल व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. तेलंगणातील हैद्राबाद येथे अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे पुर देखील येत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) आदिलाबाद, निजामाबाद आणि महबूबनगरसह अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, सोमवार सकाळपर्यंत एकाकी भागात अति-मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात देखील गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि विदर्भातील काही गावांत पूर आले. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाली आहे. पुसद शहरात काही गावकऱ्यांची शेतजमिनी पाण्याखाली गेली.