Man Arrested for Threatening Sanjay Raut: कंगना रनौत च्या नावाने संजय राऊत यांना कॉल करुन धमकावल्याप्रकरणी एकाला पोलिसांकडून अटक
Man Arrested for Threatening Sanjay Raut (Photo Credits-IANS)

Man Arrested for Threatening Sanjay Raut: अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबईबद्दल केलेल्या पाकव्याप्त कश्मीरच्या वक्त्यव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच तिने मुंबईत येऊ नये यासाठी धमकी दिल्याचे कंगना हिने म्हटले आहे. पण कंगना ही 9 सप्टेंबरला मुंबईत आली त्यावेळी तिला Y पद्धतीची सुरक्षा देण्यात आल्याचे दिसून आले. याच पार्श्वभुमीवर आता शिवसेना नेते  संजय राऊत  (Sanjay Raut) यांना कंगना  हिच्या नावाने फोन करुन धमकावणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.(Kangana Ranaut On CM Uddhav Thackeray: तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, मात्र सन्मान तुम्हालाचं कमावावा लागेल - कंगना रनौत)

पलाश बोस असे आरोपीचे नाव असून टॉलीगंज मधील कोलकाता मधील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. बोस याने कंगना रनौत हिचे नाव वापरुन शिवसेना नेते संजय राऊत यांना इंटरनेट कॉलवरुन धमकावल्याच्या प्रकरणी त्याला गुरुवारी रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली आहे.(Kangana Ranaut vs BMC: कंगना रनौत हिचे ऑफिस पाडण्याचा सर्वस्वी निर्णय महापालिकेचा; राज्य सरकारची यामध्ये भुमिका नाही- शरद पवार)

दरम्यान, संजय राऊत यांनी कंगना हिचे ऑफिस तोडल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, कंगनाच्या ऑफिसवर करण्यात आलेली ही कारवाई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली. यामध्ये माझे काही घेणे-देणे नाही आहे. त्याचसोबत एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राऊत यांनी असे ही म्हटले की, जे लोक आमच्या पक्षाला बाबरची सेना बोलातात. त्यांनी जाणून घ्या की आम्ही तिच लोक आहोत ज्यांनी बाबरी मस्जिद पाडली होती.