Malegaon Municipal Corporation: मालेगाव महापालिकेत काँग्रेसचा सुफडा साफ,  28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
NCP (Photo Credit - Twitter)

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि राष्ट्रीय काँग्रेस (Congress) अशा तिन पक्षांची महाविकासआघाडी सत्तेत असताना स्थानिक पातळीवर मात्र हेच पक्ष एकमेकांना धक्के देताना दिसत आहेत. मालेगाव (Malegaon ) महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने अशाच प्रकारचा धक्का काँग्रेस पक्षाला दिला आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व 28 नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यासिवाय मालेगावमधील काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख (Tahira Shaikh) ​यांनीही काँग्रेसच्या पंजाला 'टाटा' करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातावर बांधले आहे. या सर्वांचे पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

निवडणुकीच्या तोंडावर मालेगाव येथे काँग्रेसला मोठाच धक्का बसला आहे. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशावेळी राशीद शेख, ताहिला शेख आणि त्यांच्यासह 28 नगरसेवकांनी पक्षांतर करत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. रशीद शेख हे काँग्रेस पक्षाच्या मुशीतील नेते म्हणून ओळखले जात. तसेच, पक्षाचे अतिशय निष्ठावंत अशीही त्यांची ख्याती होती. मात्र, असे असतानाही काँग्रेस पक्षासोबत त्यांचे बिनसले आणि त्यांनी पक्षांतर कले. (हेही वाचा, Ajit Pawar on Congress: निधीवाटप, काँग्रेसच्या नाराजीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रत्युत्तर 'संपूर्ण राज्य डोळ्यांसमोर ठेवून निधी द्यावा लागतो')

ट्विट

​काँग्रेसमधील नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने मालेगाव महापालिकेत आता सत्तांतर होणार आहे. एकूण 84 जागांच्या महापालिकेत काँग्रेस आता शून्यावर आली आहे. मालेगाव महापालिका निवडणूक 2017 मध्ये काग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्या वेळच्या पक्षीय बलाबलीनुसार काँग्रेस-30, राष्ट्रवादी काँग्रेस-20 तर शिवसेना 12 आणि एमआयएम-7 जागांवर विजयी झाले होते. जनता दल सेक्युलरला 7 जागा मिळाल्या होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीकडे जवळपास 48 नगरसेवक झाले आहेत.