बांद्रा टर्मिनस यार्ड (Bbandra Terminus Yard) येथे मंगळवार, 13 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 00.00 ते बुधवार, 14 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 06.00 वाजेपर्यंत 30 तासांचा मोठा ट्रॅफिक ब्लॉक बीडीटीएस यार्डच्या उत्तरेकडील पायाभूत सुविधांच्या अपग्रेडेशनच्या कामासाठी घेण्यात येईल. वांद्रे टर्मिनस यार्ड येथे उत्तरेकडील पायाभूत सुविधांच्या सुधारणांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वांद्रे टर्मिनस यार्डमध्ये आज म्हणजेच 13 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 00.00 ते बुधवार, 14 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 06.00 वाजेपर्यंत असा 30 तासांचा जम्बो ट्रॅफिक ब्लॉक (Major Traffic Block) घेण्यात येत आहे. त्यामुळे याचा रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. अनेक ट्रेन पूर्णत: तर काही अंशत: रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर काही ट्रेनच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या वेळापत्रकात झालेले बदल पुढीलप्रमाणे आहेत.
अंशत: रद्द/शॉर्ट टर्मिनेटेड ट्रेन क्रमांक 22904 अंतर्गत भुज-वांद्रे टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस 13 सप्टेंबर 2022 रोजी बोरिवली येथे कमी केली जाईल. त्यामुळे बोरिवली आणि वांद्रे टर्मिनस दरम्यान अंशतः रद्द राहील. (हेही वाचा, Mumbai Airport BEST Bus Services: मुंबई विमानतळ बससेवेसाठी 'बेस्ट'ने सुरु केली 'आसन आरक्षण' सेवा)
ट्रेन क्रमांक 19004 भुसावळ-वांद्रे टर्मिनस खान्देश एक्सप्रेस 14 सप्टेंबर 2022 रोजी बोरिवली येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल आणि त्यामुळे बोरिवली आणि वांद्रे टर्मिनस दरम्यान अंशतः रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 12936 सूरत-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस 14 सप्टेंबर 2022 रोजी बोरिवली येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल आणि त्यामुळे बोरिवली आणि वांद्रे टर्मिनस दरम्यान अंशतः रद्द केली जाईल.
ट्विट
Major traffic block of 30 hrs will be undertaken at Bandra Terminus Yard from 00.00 hrs of Tues, 13th Sept, 2022 to 06.00 hrs of Wednesday, 14th Sept, 2022 for carrying out the work of infrastructural upgradation at BDTS Yard north end.
Few trains partially cancelled.
— Western Railway (@WesternRly) September 13, 2022
प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल पश्चिम रेल्वे दिलगीर आहे. अनेकदा प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वेच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी, वेळोवेळी आवश्यक ते बदल करुन पायाभूत सूविधा उभारण्यासाठीही ब्लॉक घेण्याची आवश्यकता भासत असल्याचे सुमित ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, जम्बो ब्लॉक घेतल्याने प्रवाशांना अनेकदा मनस्तापाला सामोरे जावे लागते. मात्र या काळात केलेल्या सुधारणांमुळे प्रवाशांचा प्रवास आरामदाही होण्यासही मदत होते.