राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150 वी जयंती. या दिनाचे औचित्य साधून गांधींजींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई लोकल रेल्वेने एक स्तुत्यप्रिय असा उपक्रम राबविला आहे. आज मध्य रेल्वे (Central Railway), हार्बर (Harbour Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर गांधी जयंती (Mahatma Gandhi Jayanti) निमित्त एक विशेष रेल्वे धावणार आहे ज्यावर गांधींजीचे विचार, त्यांचे छान संदेश लिहिलेले असतील. लोकांपर्यंत विशेष करुन आजच्या पिढीपर्यंत गांधीजींचे अहिंसा आणि स्वच्छता यावरील सुंदर विचार पोहोचावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ही विशेष लोकल सीएसएमटी ते ठाणे आणि वाशीदरम्यान चालविण्यात येणार आहे.
ही विशेष लोकल सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरुन ठाण्याकरिता सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी सुटणार असून दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी ती ठाण्याला पोहोचेल. ही विशेष रेल्वे सीएसएमटी ते भायकळा दरम्यान जलद डाउन मार्गावरून आणि भायखळा ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गावरुन चालणार आहे.
पश्चिम रेल्वेचे ट्विट:
हाल ही में ईएमयू वर्कशॉप, महालक्ष्मी द्वारा एक रेक पर चित्रों और स्लोगनों के माध्यम से #MahatmaGandhi की #150thBirthAnniversary पर उनके स्वच्छता के संदेशों को दर्शाया गया है। मुंबई उपनगरीय खंड पर चलने वाला यह रेक लाखों लोगों तक #GandhiAt150 और उनके संदेश को पहुंचाएगा। pic.twitter.com/CfMNlJsUQB
— Western Railway (@WesternRly) October 2, 2019
हेही वाचा- आजपासून 'Single Use' प्लास्टिक ला देशभरात बंदी
तसेच हार्बर मार्गावरील सीएसएमटी-वाशी स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म 1 वरुन सकाळी 11 वाजून 20 मिनिटांनी निघून दुपारी 12.9 मिनिटांनी वाशीला पोहोचणार आहे. या रेल्वेच्या माध्यमातून गांधीजींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा रेल्वेचा अभिनव उपक्रम खूपच कौतुकास्पद असा आहे.
महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून आजपासून (2 ऑक्टोबर) सिंगल युज प्लास्टिकवर पुर्णपणे बंदीही घालण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरात येणा-या प्लास्टिक बंदीचा वापर टाळण्याचे आवाहन केले होते. या आवाहन संपूर्ण देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला असून आजपासून 100% प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे.