महा-रेरा (फोटो सौजन्य- ट्विटर)

गृह खरेदी करताना ग्राहक काही वेळेस बिल्डर्सने दिलेल्या गृह खरेदीवरील सूटला बळी पडून लुटले जातात. तर काही वेळेस गृह खरेदी केल्यानंतर ती इमारत अनधिकृत जागेवर बांधली गेल्याची फसवणूक ग्राहकांना बिल्डर्सकडून केली जाते. अशा परिस्थितीत अधिकृत इमारतीमध्ये घराचा ताबा मिळविण्यासाठी महा- रेराने(MahaRERA) सर्व बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना इमारत बांधणी बाबत कडक आदेश दिले आहे.

ग्राहकांना लुटणारे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स (Builders and Developers) यांच्यापासून वाचण्यासाठी महा-रेराने नवी इमारत बांधणाऱ्या बिल्डर्सना Quality Assurance Certificate दाखल करावे असा आदेश दिला आहे. तसेच 1 डिसेंबरपूर्वी हे सर्टिफिकेट महा-रेराच्या संकेतस्थावर (MahaRERA Website) दाखल करण्यास सांगितले आहे. बहुदा इमारत बांधणीनंतर नित्कृष्ट दर्जाचे साहित्य, इमारतीमधील गळती किंवा इमारतीचा काही भाग कोसळणे अशा घटना घडून येतात. त्यासाठी महा-रेराच्या अधिकाऱ्यांनी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना त्यांचे येणारे नवे प्रोजेक्ट आणि Quality Assurance Certificate रजिस्ट्रेशनच्या वेळी सादर करण्यास सांगितले आहे.

हे सर्व कागदपत्र दाखल करण्यापूर्वी महा- रेराने इमारत इंजिनियर यांना इमारतीसाठी लागणारे साहित्यसमवेत सिमेंट, वीटा, कॉंक्रीट आणि लोखंड यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.