महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज जनतेशी संवाद साधला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यातच गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले एक आठवड्याचे अल्टिमेटम आज संपले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन (Lockdown) लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे. परंतु, महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नसल्याचा दावा, महाविकास विकास आघाडीतील नेते केला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करत कोरोना, महागाई, संजय राठोड यांच्यासह विविध मुद्द्यावर भाष्य केले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर तोफ डागली आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या किंमतीने शतक गाठल्याचे सांगत केंद्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या पूजा चव्हाण प्रकरणावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात विरोधकांकडून गलिच्छ राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याशिवाय कोरोना संदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पहिला अनुभव लक्षात घेता दुसरी लाट जास्त वाढू न देता थोपवण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. कुठेही काहीही कमी पडू द्यायचे नाही या जिद्दीनं सरकार कोविडचा सामना करत आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसचे मंत्री, आमदार सायकरुन विधानभवनात येणार; इंधन दरवाढी वरुन घेतला निर्णय
ट्विट-
पेट्रोलची सेंच्युरी प्रथम अनुभवत आहोत. त्यातही सेस वाढवलाय. आत्ता जी भाववाढ केली त्यात राज्याच्या वाट्याला काही येणार नाही. त्यांनी अशा पद्धतीने कर लावला आहे की त्यांच्या तुंबड्या भरतील. pic.twitter.com/uL1xnSQiaR
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 28, 2021
तसेच संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे व तो स्वीकारलेला आहे. तसेच, या प्रकरणी नि:पक्षपाती चौकशीचे व तपासाचे आदेश दिले आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.